खासगी दवाखान्यांकडून लूट जोरात सुरु , उस्मानाबाद प्रशासन मात्र शांत

Doctor
Doctor
Updated on

उस्मानाबाद : खासगी दवाखान्यांनी आपत्तीच्या काळात सुध्दा रुग्णांना लुटण्याचा प्रकार सुरु केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयामध्ये अँटिजेन टेस्ट करण्यासाठी दोन हजार रुपयाची आकारणी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. जी टेस्ट शासनाकडुन त्याना मोफत मिळते.

त्यातुन खाजगी दवाखाने तपासणीसाठी दोन हजार रुपयाची आकरणी करत असतील तर ही शासनाची व नागरिकांच्या पैशाची लुट असल्याचे दिसुन येत आहे. जिल्हा प्रशासनाकडुन अशा गोष्टीकडे अत्यंत गांभीऱ्याने पाहण्याची गरज असल्याची भावना आता रुग्णाच्या नातेवाईकाकडुन व्यक्त होत आहे.


आपत्तीच्या काळात सर्वत्र डॉक्टरांना त्यांच्या स्टाफला कोरोना योध्दा अशी उपाधी देऊन त्यांचे आभार मानत आहेत. पण या क्षेत्रातील प्रवृत्ती देखील या काळात मोठ्या प्रमाणावर डोकवर काढताना दिसत आहे. ही प्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्राची सुध्दा प्रतिमा मलिन करताना दिसत आहे. शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत या खासगी दवाखान्यांनी या काळात सुध्दा लुटण्याची संधी सोडलेली नाही.

मोफत मिळणाऱ्या अँटिजेन टेस्टमधुन तपासणी करताना त्यातुन काही रक्कम निश्चितपणाने दवाखान्यानी घेतली पाहिजे ही बाब ग्राह्य धरुनही ती रक्कम किती घ्यावी याचेही भान दवाखाना विसरला आहे. स्वतःच्या टोलेजंग इमारती व यंत्रणेचा खर्च दुसऱ्याच्या खिशातुन वसुल करण्याची ही पध्दत अत्यंत दुर्देवी आहे. सध्याच्या स्थितीला रुग्णामध्ये एकप्रकारची भिती निर्माण झाली असुन त्याच भितीचा फायदा हे डॉक्टर घेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडुन अशा दवाखान्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या दराच्या पुढे जाऊन हे डॉक्टर कायद्याला देखील जुमानत नसल्याचे चित्र आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com